Covid Vaccine SAKAL
देश

सरकारची मोठी घोषणा! बुस्टर डोसचा कालावधी झाला कमी

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं ही महत्वाची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत सहा महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. (reduces gap for COVID 19 precaution doses from existing 9 months to 6 months)

आरोग्य मंत्रालयानं आपल्याला निवदेनात म्हटलं की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी अर्थात ३९ आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरु आहे. त्यानुसार नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या (NTAGI) स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीनं (STSC) हे निर्देशित केलंय की, बूस्टर डोसचा कालावधी नऊ महिन्यांवरुन सहा महिन्यांवर अर्थात २६ आठवड्यांवर आणण्यात यावा.

त्यामुळं आता १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येईल. हा बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर (CVCs) अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल. तर ६० वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बुस्टर डोस घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT