Savarkar Sakal
देश

राजकीय वादाचे प्रतिबिंब परीक्षांमध्ये

‘डब्लूबीसीएस’च्या परीक्षेमध्ये, ‘तुरुंगात असताना ब्रिटिश प्रशासनाकडे दयेचा अर्ज करणारा स्वातंत्र्यसैनिक कोण?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता.

श्‍यामल रॉय

कोलकता - भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांच्यातील राजकीय वाद (Political Dispute) केंद्रीय आणि राज्य आयोगांच्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्‍नांमधूनही प्रतिबिंबीत (Reflection) होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पश्‍चिम बंगालमधील परिस्थितीबाबत विचारलेल्या एका प्रश्‍नाला प्रत्युत्तर म्हणून पश्‍चिम बंगाल लोकसेवा आयोगाच्या (डब्लूबीसीएस) (WBBS) परिक्षेतील एका प्रश्‍नाद्वारे भाजपला डिवचण्यात आले आहे.

‘डब्लूबीसीएस’च्या परीक्षेमध्ये, ‘तुरुंगात असताना ब्रिटिश प्रशासनाकडे दयेचा अर्ज करणारा स्वातंत्र्यसैनिक कोण?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाचा रोख स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांकडे असल्याचे जाणवते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदर्शस्थानी मानतो. अत्यंत जहाल आणि देशासाठी त्याग करताना मागेपुढे न पाहणारे क्रांतिकारक, अशी सावरकारांची प्रतिमा अधिक प्रकर्षाने सर्वांसमोर आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.

‘यूपीएससी’च्या परीक्षेत, पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत मतप्रदर्शन करण्यास परीक्षार्थींना सांगण्यात आले होते. हे पश्‍चिम बंगाल सरकारला झोंबले असावे. कारण, ‘डब्लूबीसीएस’च्या परीक्षेत राष्ट्रीय नागरीक नोंदपुस्तिकेची (एनआरसी) सध्याची स्थिती आणि टूलकिट याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला होता. या दोन मुद्द्यांवरून भाजप सरकारवर प्रचंड टीका झाली होती. बंगालमधील हिंसाचाराची सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशावरून विशेष तपास पथकाचीही स्थापना झाली आहे. ‘यूपीएससी ही निष्पक्ष संस्था होती.

मात्र, आता भाजपकडून त्यांना प्रश्‍न पुरविले जातात. शेतकरी आंदोलनावर विचारलेले प्रश्‍नही राजकीय हेतूंनी प्रेरित असल्यासारखे वाटतात. भाजपमुळे यूपीएससी सारख्या संस्थांचे महत्त्व कमी होत आहे,’ अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. ‘सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणूक घ्यावी का?’ आणि ‘शेतकरी आंदोलन राजकीय हेतूंनी प्रेरित असल्यासारखे वाटते का?’ असेही प्रश्‍न ‘यूपीएससी’च्या परीक्षेत विचारण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT