देश

फक्त 12 रुपयांत दोन लाखाचे विमा संरक्षण; जाणून घ्या योजना

नामदेव कुंभार

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : आजकालच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळात दहा-12 रुपयांत काय मिळते? काही ठिकाणी चहा घ्यायचा म्हटले तरी 15 रुपये मोजावे लागतात. त्यातच आता आलेल्या कोरोना महामारीमुळे विमा घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. काहीजण भितीपोटी आणि माहिती नसल्यामुळे महागडा खासगी विमा घेतात. मात्र, केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत फक्त 12 रुपयांत दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतेय. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अतंर्गत फक्त 12 रुपयांत दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळते. कोरोना महामारीच्या काळात देशातील गरीब व्यक्ती देखील याचा लाभ घेऊ शकतो. जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल...

देशातील कोणताही व्यक्ती वर्षाला 12 रुपयांत दोन लाख रुपयांचे विमा सरंक्षण घेऊ शकत. 12 रुपयांत वर्षभर विमा संरक्षण मिळते. प्रत्येक वर्षाला विमा अद्यावत होत राहतो. मे महिन्यात या विम्याची रक्कम कटते. या योजनेमुळे आयुष्यात येणाऱ्या दुर्घटनेच्या काळात आर्थिक (Personal Accident Insurance Scheme) अडचणीचा सामना करावा लागणार नाही. 12 रुपयांच्या या विम्याअंतर्गत एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळू शकतात. जर एखादी दुर्घटना झाली आणि त्यात अंपगत्व आले तर विम्याची रक्कम दिली जाते. जर काही काळासाठी अंपगत्व आले असेल तर एक लाख रुपये इतकी रक्कम मिळते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ (PMSBY) 18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते. प्रत्येक वर्षी 31 मे रोजी या योजनेचे 12 रुपये बँक खात्यातून कापले जातात. https://jansuraksha.gov.in/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर विमा योजनेचे फॉर्म आणि माहिती उपलब्ध आहे. हा फॉर्म इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, बांगाली, कन्नड, ओडिया, तेलगू आणि तामिळ भाषेत दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding : क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील खेडेगावात, सेलिब्रिटींची उपस्थिती; पोलिसांचा बंदोबस्त, कसं असेल नियोजन

Pankaja Munde PA case: पंकजा मुंडेंचे PA यांच्या पत्नीचा रहस्यमय मृत्यू; कुटुंबाचा हत्येचा आरोप… नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : सेव्हनहिल उड्डाणपुलावर भीषण अपघात: अचानक ब्रेकचा बळी ठरला ५ वर्षीय चिमुकला

CM Yogi Adityanath: योगींनी प्रयागराजमध्ये केले गंगा पूजन व हनुमानजींचे दर्शन; माघ मेळ्यासाठी मागितला आशीर्वाद

Hinjewadi Accident : मारुंजी अपघात; मिक्सर चालकासह प्लँट मालकालाही अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT