Mukesh Ambani  esakal
देश

Mukesh Ambani सिंगापूरमध्येही ऑफिस उभारणार; जागतिक स्तरावर व्यवसाय वाढवणार!

अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी देखील सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू करण्यासाठी मदत करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याचा विचार करत आहेत. जगातल्या इतरही काही श्रीमंत लोकांनी सिंगापूरमध्ये आपली फॅमिली ऑफिसेस सुरू केली आहेत. आपले आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी या लोकांना फॅमिली ऑफिसेसची गरज पडते.

मुकेश अंबानी यांनी फॅमिली ऑफिससाठी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी मॅनेजरची निवड केली आहे. त्यांनी जागाही बघून ठेवली आहे. सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू करण्याचा अंबानींचा निर्णय हा त्यांचा व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अलीकडे, सिंगापूर हे कमी कर आणि सुरक्षेमुळे श्रीमंतांसाठी फॅमिली ऑफिसेस सुरू करण्यासाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या यादीत अब्जाधीश रे डॅलिओ आणि गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांचाही समावेश आहे.

शिवाय, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी देखील सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू करण्यासाठी मदत करत आहेत. या प्रकरणावर अंबानींनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिेलेली नाही. सप्टेंबरमध्ये, अब्जाधीश गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आणि आयआयएफएल वेल्थच्या भागीदारीत श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT