Reliance Industries announces pay cuts Mukesh Ambani to forgo entire compensation 
देश

Coronavirus : रिलायंस करणार कामगारांच्या वेतनात कपात; अशी असेल कपात

वृत्तसंस्था

मुंबई : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायंस कंपनीने हायड्रोकार्बन व्यवसायाशी संबंधित कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायात काम करणाऱ्या ज्या कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतन 15 लाखाहून अधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्क्यांनी कपात केली जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्यांचे वेतन वार्षिक 15 लाखांनी कमी असेल त्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या सर्व संचालकांच्या पगारामध्ये 30 ते 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, कामगिरीवर आधारित बोनसही आता पुढे ढकलण्यात आले आहेत. कंपनीचे एमडी आणि अध्यक्ष मुकेश अंबानी स्वत: एक वर्षाची भरपाई घेणार नाहीत. कंपनीचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनमुळे पेट्रोलियमची मागणी घटली आहे, ज्यामुळे हायड्रोकार्बन व्यवसायाचा महसूल घटला आहे.

कोरोनामुळे होत असलेले मृत्यू ही घाबरण्यासारखी स्थिती नाही : नारायण मूर्ती

रिलायंस इंडस्ट्रीजच्या व्यवसायावर कोरोना साथीचा परिणाम झाला आहे. विशेषत: हायड्रोकार्बनच्या व्यवसायात तोटा सुरु झाला आहे. कारण, रिलायन्सच्या रिफाईंड प्रोडक्ट आणि पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT