EPFO  
देश

EPFOच्या खातेधारकांना दिलासा; पुन्हा काढता येणार अ‍ॅडव्हान्स

कोरोना काळात अडचणीत असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा देशातील नागरिकांची आर्थिकस्थिती बिघडवली आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठनेनं (EPFO) आपल्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, लाभार्थ्यांना दुसऱ्यांदा आपल्या पीएफ अकाउंटमधून नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्सचा रक्कम काढता येणार आहे. (Relief to EPFO account holders advance can be withdrawn second time)

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मार्च 2020 मध्ये देखील सरकारनं 'प्रधानमंत्री गरीब कल्याण' योजनेंतर्गत (PMGKY) ईपीएफओ ग्राहकांना अॅडव्हान्सची सुविधा दिली होती. त्यानंतर आज श्रम मंत्रालय़ानं देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्रासलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा नॉन-रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्स काढण्याची परवानगी दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, खात्यात जमा रक्कमेच्या 75 टक्के म्हणजेच तीन महिन्यांच्या पगाराइतकी (बेसिक पगार आणि महागाई भत्ता) रक्कम खात्यातून काढता येणार आहे.

केवळ 72 तासांत खात्यात जमा होतात पैसे

कोविड-19 अंतर्गत ऑनलाइन दाव्यांवर ऑटो मोडनुसार क्लेम सेटल करण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 72 तासांत पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत. सध्या ईपीएफओचे 6 कोटी खातेधारक आहेत. 1 एप्रिल 2020 पासून 12 मे 2021 पर्यंत 72 लाख कर्मचाऱ्यांनी एकूण 18,500 कोटी रुपयांचा नॉन रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हन्सचा लाभ घेतला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ईपीएफओने सुमारे 1.63 कोटी खातेधारकांना 81,200 कोटी रुपयांचे क्लेम सेटल केले आहेत.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ बॅलन्स

तुम्ही केवळ एक मिस्ड कॉल देऊन तुमचा पीएफ बॅलन्स माहिती करुन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आकाऊंटमध्ये शिल्लक असलेल्या रक्कमेची माहिती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT