Gujrat Court on indian cow Sakal
देश

Gujrat Court : 'गायीपासून धर्माची निर्मिती, गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न सुटतील'

गायीच्या शेणापासून बनवलेल्या घराला एटॉमिक रेडिएशनचा फरक पडत नाही असंही सांगण्यात आलं आहे.

दत्ता लवांडे

गांधीनगर : गुजरातमधील कोर्टाने गायीच्या अवैध वाहतूक आणि हत्येसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. देशातील गोहत्या थांबली तर पृथ्वीवरील सर्व समस्या सुटतील असं मत तापी जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश समीर विनोदचंद्र न्यास यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील एका २२ वर्षीय तरूणाला अवैधरित्या गायीची वाहतूक केल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दरम्यान, गायीचे महत्त्व सांगताना न्यायालयाने सांगितलं की, 'आपल्या धर्माची उत्पत्ती गायीपासून झालेली आहे. गायीच्या शेणापासून बनवलेल्या घराला एटोमिक रेडिएशनचा सुद्धा काही फरक पडत नाही. त्याचबरोबर गोमूत्राचा सुद्धा अनेक रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोग होतो' असं मत न्यास यांनी व्यक्त केलं. पण त्यांच्या या दाव्याला त्यांनी कोणताही वैज्ञानिक आधार दिला नाही.

हा निकाल देताना कोर्टाने एका संस्कृत श्लोकाचा हवाला दिला आहे. वेदांची उत्पतीसुद्धा गायीच्या अस्तित्वामुळेच झाली असून जगातून गाय नष्ट झाली तर विश्वाचे अस्तित्व नष्ट होईल असं म्हणत गोहत्या आणि गायींची बेकायदेशीर वाहतूक ही सुसंस्कृत समाजासाठी लांछनास्पद गोष्ट असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे. आपल्या गुजराती भाषेतील 24 पानांच्या निकालात कोर्टाने हे निरीक्षणे नोंदवली आहेत.

दरम्यान, जुलै 2020 मध्ये 16 हून अधिक गायी एका ट्रकमध्ये बेकायदेशीरपणे वाहून नेत असताना अटक करण्यात आलेल्या मोहम्मद आमीन आरिफ अंजुमच्या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. त्यांना दोरीने बांधून अन्नपाण्याविना वाहून नेण्यात येत होते. त्यानंतर त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपीला ५ लाखांच्या दंडासहित जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT