देश

धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : मद्रास हायकोर्टाने आंतरजातीय विवाहासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हायकोर्टाने म्हटलंय की, एखाद्या व्यक्तीने आपला धर्म सोडून दुसरा धर्म जरी स्विकारला तरीही जन्मापासून असलेली त्याची जात बदलत नाही. याबाबतची याचिका पी सर्वानन यांनी हायकोर्टात केली होती, जे स्वत: आदि-द्रविड जातीचे आहेत, जी जात अनुसूचित जातींमध्ये येते. त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्विकारल्यामुळे मागास जातीचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हिंदू-अरुनथथीयार या जातीच्या मुलीशी लग्न केले, ज्या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्येच होतो.

त्यांच्या या लग्नानंतर पी. सर्वानन यांनी त्यांना 'आंतरजातीय विवाहित' असे प्रमाणपत्र मिळावे म्हणून सेलम जिल्ह्यातील तहसीलदारांकडे अर्ज केलास होता. मात्र तो अर्ज अमान्य करण्यात आला. सेलम जिल्हाधिकारी यांनीही याविरुद्धचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर पी. सर्वानन यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. 'आंतरजातीय विवाहित' असल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळावं, अशी विनंती त्यांनी हायकोर्टाकडे केली. त्यांना हे प्रमाणपत्र मिळवून आंतरजातीय विवाहितांना मिळणाऱ्या शासकीय सवलती मिळवण्याची इच्छआ होती.

यामधून नोकरीत मिळणारं प्राधान्य देखील त्यांना हवं होतं. त्यासाठी त्यांनी केलेल्या याचिकेमध्ये त्यांच्याकडे मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र असून पत्नीकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे, त्यामुळे त्यांचा हा विवाह आंतरजातीय असल्याचा त्यांचा दावा होता. यावर निर्णय देताना हायकोर्टाने म्हटलं की, ते जन्माने अनुसूचित जातीचे असून धर्मांतरण केल्यामुळे त्यांची जात बदलत नाही. पती-पत्नी दोघेही अनुसूचित जातीचेच आहेत आणि म्हणऊन त्यांचा विवाह आंतरजातीय ठरत नाही, असं स्पष्टीकरण देत कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT