remove-china-apps 
देश

चीनला धडा शिकवण्यासाठी 50 लाख भारतीयांनी केले हे ॲप डाउनलोड

पीटीआय

नवी दिल्ली - भारतात सध्या 'रिमुव्ह चाईना ॲप' चांगलंच लोकप्रिय होत असल्याचं दिसत आहे. हे ॲप मोबाईलमधील चीनी ॲपची ओळख करुन देते. त्यामुळे मोबाईलमधील ॲप कोणत्या कंपनीनी बनवलं आहे हे ओळखणं सोप्प जातं. काही आठवड्याच्या कालावधीतच या ॲपला 50 लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. तसेच गूगल प्ले स्टोरवर या ॲपला 1.89 लाख रिव्यू आणि 4.9 स्टार मिळाले आहेत.

भारत आणि चीन या देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सैन्य एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही देशांकडून सीमा भागावर युद्ध उपकरणाची जुळवाजुळव सुरु आहे. तसेच कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरला आणि या व्हायरसने संपूर्ण जगाला जेरीस आणलं आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात चीन विरोधी वातावरण तयार झालं आहे. भारतीयांमध्येही चीनच्या दांडगाईविरोधात रोष आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकत आहेत. त्यातूनच चीनी ॲप मोबाईलमधून काढून टाकणारे 'रिमुव्ह चाईना ॲप' सध्या चर्चेत आहे. अनेक भारतीयांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे. तसेच टिकटॉक, यूसी ब्राऊझर अशा चीनी ॲपना भारतीयांनी मोबाईलमधून डिलीट केलं आहे.

'रिमुव्ह चाईना ॲप'ला मे महिन्यातील 17 तारखेला बनवण्यात आलं आहे. तेव्हापासून हे ॲप चांगलंच गाजत आहे.  वन टच ॲप लॅब्सने या ॲपची निर्मिती केली आहे. ही कंपनी जयपूरमधील आहे. तसेच व्यायसायिक उद्धेशासाठी या ॲपला बनवण्यात आलं नाही. शैक्षणिक उद्धेशासाठी या ॲपला तयार करण्यात आले असून लोकांना मोबाईलमधील ॲप कोणत्या देशात बनले आहे याची माहिती मिळावी यासाठी या ॲपला बनवण्यात आलं आहे असं कंपनीने सांगितलं आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिला आहे. त्यामुळे अनेक लोक स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनी ॲप टिकटॉकविरोधात चांगलेच रण पेटले होते. अनेकांनी या ॲपला मोबाईलमधून डिलीट केले होते. तसेच या ॲपची गूगल प्ले स्टोरवरील रेटिंग चांगलीच घसरली होती. त्यामुळे भारतीय सध्या चीनी वस्तूंच्या हातधुवून मागे लागल्याचं दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT