Patanjali Soan Papdi|Baba Ramdev Esakal
देश

Patanjali Coronil: 'कोरोनिल'बाबत तीन दिवसांत...; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

कोरोनिल हे कोरोनावरील औषध असल्याचा दावा बाब रामदेव यांनी केला होता. याविरोधात अनेक डॉक्टरांनी याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टात समोवारी सुनावणी पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : 'कोरोनिल' हे कोरोना आजार बरा करणारं औषध असल्याचा दावा योगगुरु बाबा रामदेव यांनी केला होता. याविरोधात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यावर सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टानं रामदेव यांना झटका देत हा दावा त्यांनी मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

दिल्ली हायकोर्टानं रामदेव यांना आदेश दिले की, त्यांनी कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंसाठी अॅलोपॅथी औषधांना दोषी ठरवल्याचा दावा मागे घ्यावा तसेच कोरोनिल हे कोरोनावरील प्रभावी औषध असल्याचा केलेला दावा मागे घ्यावा. त्याचबरोबर सोशल मीडियावर याबाबत केलेले ट्विट्स त्यांनी तीन दिवसांत डिलीट करावेत, असे निर्देशही हायकोर्टानं दिले आहेत.

बाबा रामदेव तसेच त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण आणि कंपनी पतंजली आयुर्वेद यांच्याविरोधात डॉक्टरांच्या संघटनेनं याचिका दाखल केली होती. रामदेव यांच्याकडून कोरोनिल या औषधाची विक्री वाढवण्यासाठी चुकीची मोहिम राबवण्यात आली. त्यानुसार, कोरोनिल हे कोरोना महामारीवरील एक औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, २७ ऑक्टोबर २०२१ला कोर्टानं बाबा रामदेवसह इतरांना समन्स बजावलं होतं. तर न्या. एजे भंभानी यांच्या खंडपीठानं २१ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी घेत निर्णय राखून ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT