नवी दिल्ली : पंजाबच्या अमृतसर येथील नुतनीकरण झालेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. 
देश

नूतनीकरणानंतर 'जालियनवाला बाग स्मारक' पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण

सरदार उधमसिंग, भगतसिंग यांना यामुळं क्रांतीकारक व्हायला धाडस मिळालं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबमधील ऐतिहासिक जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरणानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी ते देशाला अर्पण केलं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे देखील उपस्थित होते. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शहीद उधमसिंग यांच्या खासगी वस्तू जसं त्यांचं पिस्तूल आणि डायरी ब्रिटन सरकारकडून पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.

यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, "पंजाबच्या वीरभूमीला आणि जालियनवाला बागेच्या पवित्र मातीला माझा सलाम. भारतमातेच्या त्या सुपुत्रांना नमन ज्यांच्यामधील स्वातंत्र्याची धग विझवण्यासाठी ब्रिटिशांकडून अमानवीय हत्याकांड घडवून आणलं गेलं. १३ एप्रिल १९१९ चे ते दहा मिनिटं स्वातंत्र्याच्या लढाईची सत्यगाथा बनली. त्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्यातच स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाचं आधुनिक रुप देशाला पहायला मिळणं आपल्यासाठी मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे"

जालियनवाला बाग हे ते स्थान आहे ज्यानं सरदार उधमसिंग, सरदार भगतसिंग यांसारख्या असंख्य क्रांतीकारी, हुतात्मे आणि सैनिकांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याचं धाडस मिळालं. कोणत्याही देशासाठी आपल्या इतिहासातील अशा घटनांकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही. यासाठी भारतानं १४ ऑगस्टला दरवर्षी विभाजनाचा स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

जालियनवाला बाग स्मारकामध्ये काय असेल?

कोरोनाचं संकटामुळं गेल्या दीड वर्षापासून जालियनवाला बाग स्मारक परिसराच नुतनीकरणाचं काम बंद होतं. यासाठी पंजाब सरकारनं २० कोटी रुपये खर्च केला आहे. जालियनवाला बाग स्मारक परिसरात एक थिएटर बनवण्यात आलं आहे. एका वेळी ८० लोक बसण्याची क्षमता असलेल्या या थिएटरमध्ये डिजिटल डॉक्युमेंट्री दाखवली जाणार आहे. यामध्ये जालियनवाला बागेच्या गेटमधून ब्रिटिश पोलिसांच्या प्रवेशापासून आतील निरपराध लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केल्याच्या घटनेचा समावेश आहे. तत्पूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात लाइट अँड साउंड शो पर्यटकांना दाखवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT