Republic Day 2023 esakal
देश

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या गोष्टींवर बंदी, खिशात पेन सुद्धा नाही नेता येणार

२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 2023 : २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा ७४ वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या विशेष प्रसंगी, दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर एक परेड आयोजित केली जाते .दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिन परेडसाठी दिल्ली पोलिसांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. परेडमध्ये येणार्‍या सर्व अभ्यागतांना त्यांचे अनिवार्यपणे पालन करावे लागेल. दिल्ली पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अशा गोष्टींचा तपशील देण्यात आला आहे, ज्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नेण्यास मनाई आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये काय घेऊ नये?

दिल्लीची प्रजासत्ताक दिनाची परेड खूप प्रसिद्ध आहे. यात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

1- कोणतेही खाद्यपदार्थ

2- बॅग, ब्रीफकेस, पेन

3- रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेप रेकॉर्डर

4- कोणतीही ज्वलनशील सामग्री (ज्याला आग लागण्याची शक्यता असते)

5- डिजिटल डायरी, पाम टॉप कॉम्प्युटर, आयपॅड

6- रिमोट कंट्रोल्ड कार की

7- थर्मास, पाण्याची बाटली, कॅन/पाऊच

8- छत्री, टॉय गन

9- अल्कोहोल, परफ्यूम, स्प्रे

10- चाकू, कात्री, ब्लेड, वस्तरा, वायर

11- कॅमेरा, दुर्बिणी, हँडीकॅम

12- नाणी

13- शस्त्र, दारूगोळा, फटाके

14 - सिगारेट, बिडी, लायटर, माचिस, लेझर लाईट

15- कटार, तलवार, स्क्रू ड्रायव्हर इ.

लोक प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या कारने किंवा अन्य मार्गाने येत आहेत, त्यांना त्यांची वाहने कॅनॉट प्लेस म्युनिसिपल पार्किंग आणि जेएलएन स्टेडियम (26 जानेवारी पार्किंग) येथे पार्क करण्याची सुविधा मिळेल. प्रवेश फक्त वैध तिकीट किंवा पास घेऊन येणाऱ्या अभ्यागतांनाच दिला जाईल. तिकीट/पास QR कोड (26 जानेवारी परेड तिकीट) द्वारे पडताळले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT