Republic Day 2023  esakal
देश

Republic Day 2023 : ‘याची देही याची डोळा’ पहायचाय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा?; असे बुक करा तिकीट!

दरवर्षी राजपथवर देशातील विविध संस्कृतींचे चित्ररथ आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात.

सकाळ डिजिटल टीम

यंदा आपला देशा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण हजेरी लावणार आहे, याचीही सर्वांना उत्सुकता असते. भारताच्या शौर्य आणि पराक्रमाच्या या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दरवर्षी राजपथवर लाखो लोक जमतात.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सामान्य आणि विशेष लोक सहभागी होतात. तसेच इतर राष्ट्रांतील पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. सरकार कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखालाही आमंत्रित करते. दरवर्षी राजपथवर देशातील विविध संस्कृतींचे चित्ररथ आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. त्यामुळे केवळ राजपथवरच नव्हे तर देशातील सर्व टिव्ही चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाते.  (Republic Day 2023: Here’s how to book Parade tickets online)

कोण आहेत यंदाचे प्रमुख पाहुणे

कोविडमुळे दोन वर्षांपासून कोणत्याही प्रमुख पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र, यावेळी दोन वर्षांनंतर इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.  प्रजासत्ताक दिनानिमित्त परदेशी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे सहभागी होणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ६ जानेवारीपासून ऑनलाइन तिकीट खरेदी सुरू झाली आहे. 9 जानेवारीपासून, लोक तिकीट काउंटरवर वैयक्तिकरित्या तिकिटे खरेदी करत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या www.amantran.gov.in या वेबपोर्टलवरून प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येतील.

राजपथवर हजेरी लावायला कसे बुक कराल तिकीट

भारत सरकारने लोकांसाठी प्रजासत्ताक दिनाची तिकिटे ऑनलाइन बुक करण्यासाठी aamantran.mod.gov.in हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. सरकारची अधिकृत वेबसाइट aamantran.mod.gov.in.वर लॉग इन करा. नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कायमचा पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून स्वतःची नोंदणी करावी लागते. यासाठी वेबसाईटच्या पेजवर जा.

तुमचा मोबाइल नंबर टाका.

- ही प्रक्रिया केल्यावर तुम्हाला Send OTP वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या मोबाइलवर OTP येईल. तो तुम्ही टाकून लॉग इन करू शकता. जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल. तर, तुम्हाला साइन अप करावे लागेल.

- येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबईल वर OTP येईल, तो टाकल्यावर तुम्हाला ज्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे तो निवडावा. 

- रिपब्लिक डे परेड, रिपब्लिक डे परेड, रिहर्सल - बीटिंग द रिट्रीट, बीटिंग द रिट्रीट - एफडीआर आणि बीटिंग द रिट्रीट सेरेमनी असे अनेक पर्यायाय या ठिकाणी आहेत.

- तुमचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुम्हाला पुन्हा लॉगिन करावे लागेल. तुमच्या सोबत येणाऱ्या प्रत्येकाची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. तसेच तुमचे ओळख पत्र अपलोड करावे लागणार आहे. 

- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक फक्त 10 तिकिटे बुक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या प्रत्येक तिकिटावर एक QR कोड असेल जो प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी स्कॅन करेल.

- प्रजासत्ताक दिनाच्या तिकिटाची किंमत 20, 100 आणि 500, यावर अवलंबून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे.

ऑफलाईन तिकीट इथे मिळेल

प्रजासत्ताक दिनाची तिकिटे सेना भवन गेट क्रमांक 2, शास्त्री भवन गेट क्रमांक 3 येथे उपलब्ध आहेत. जंतरमंतर आणि गेट क्रमांक 1 प्रगती मेन गेट येथून तिकिटे ऑफलाइन खरेदी करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT