Special Operations Commando of ATS 
देश

Republic Day 2024: प्रियंका पवार ATS ची स्पेशल ऑपरेशन कमांडो कशी बनली? मंत्र्याने सांगितला खास किस्सा

Special Operations Commando of ATS: उत्तर प्रदेशात दहशतवाद्याविरोधात लढण्यासाठी स्पेशल पोलीस ऑपरेशन टीमची (SPOT) कमांडो यूनिट स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांना देखील या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी स्पेशल पोलीस ऑपरेशन टीमची (SPOT) कमांडो यूनिट स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिलांना देखील या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. महिला कमांडो टीममध्ये सहभागी होण्याचा एक खूप चांगला किस्सा आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी महिला कमांडो प्रियंका पवारचे तोंडभरुन कौतुक केलंय.

प्रियंका पवार या यूपी सरकारच्या स्पेशल पोलीस ऑपरेशन टीमच्या महिला कमांडो आहेत. त्यांचा कमांडो बनण्याचा किस्सा अत्यंत रंजक आहे. मंत्री असीम अरुण यांनी हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Republic Day 2024 How UP Priyanka Pawar became a Special Operations Commando of ATS The minister told a special story)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला एटीएस प्रमुख या नात्याने SPOT ची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राज्यातील सर्व पोलीस आणि PAC तील इच्छूक उमेदवारांची नावे मागवण्यात आली होती. अनेकांनी यासाठी नोंदणी केली. अनेकांनी परीक्षा दिल्या. परीक्षा कठीण होती. त्यामुळे काहीजणच उत्तीर्ण होऊ शकले, असं असीम अरुण म्हणाले.

एका दिवशी SPOT चे इन्सपेक्टर माझ्याकडे आले अन् म्हणाले की एक मुलगी परीक्षा देण्यासाठी आली आहे. काय करावं? मी म्हटलं त्या मुलीला बोलवा. माझ्यासमोर प्रियंका पवार आली. म्हणाली, सर मला कमांडो बनायचं आहे. मी कुश्तीची खेळाडू आहे.

प्रियंका हिच्यामध्ये जोश होता आणि स्पोर्ट्समध्ये असलेला फिटनेस. मला माझी चूक लक्षात आली. आम्ही जे अर्ज मागवले होते त्यात आम्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तरतूद केली नव्हती. पण, आम्ही आमची चूक सुधारली. प्रियंकाची परीक्षा घेण्यात आली, असं ते म्हणाले.

प्रियंका SPOT ची परीक्षा उत्तीर्ण झाली , त्यामुळे तिची निवड करण्यात आली. प्रियंकाने खूप चांगली कामगिरी केली. तिच्याकडून प्रेरणा घेऊन SPOT मध्ये सहभागी होण्यासाठी आणखी काही महिला पुढे आल्या. त्याही आता या धोकादायक ऑपरेशन्समध्ये सामील झाल्या आहेत, अशी माहिती असीम यांनी दिली. मंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, 'जोखीम घेणे असो किंवा कार्यक्षमतेची गोष्ट असो, म्हारी छोरियां किसी से कम हैं के.' (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

SCROLL FOR NEXT