Republic Day parade Team eSakal
देश

Republic Day Parade : सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

सकाळ डिजिटल टीम

Republic Day Parade : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सलामी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन २५ पाउंडर तोफा इतिहास जमा होणार आहे.

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून मेड इन इंडिया 105 मिमी इंडियन फील्ड गनने सलामी दिली जाणार आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परडमध्ये सर्व उपकरणे स्वदेशी असतील. यामध्ये आकाश वेपन सिस्टम, रुद्र आणि एएलएच ध्रुव सारखे हेलिकॉप्टर आदींचा समावेश असणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराची सर्व उपकरणे मेड इन इंडियाची असणार आङे. यंदाच्या परेडमध्ये 21 तोफांची सलामी स्वदेशी बनावटीच्या 105 मिमी इंडियन फील्ड गनद्वारे (IFGs) दिली जाणार आहे. याशिवाय सर्व दारूगोळादेखील स्वदेशी असणार आहे.

25-पाउंडर आर्टिलरी

ब्रिटिश फील्ड गन सलामीसाठी 1940 पासून वापरले जात होते. दुसऱ्या महायुद्धात ही तोफेचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या तोफेचे वजन 1633 किलो, लांबी 15.1 फूट आहे.

यातून बाहेर पडणाऱ्या शेलची रेंज साडेबारा किलोमीटर आहे. दुस-या महायुद्धात त्याचा वापर शत्रूच्या टाक्या नष्ट करण्यासाठी केला जात असे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानसोबतच्या पहिल्या युद्धात म्हणजे 1947 च्या भारत-पाक युद्धात या तोफेचा वापर केला होत. यानंतर 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातही याचा वापर केला गेला होता. तसेच 1962 च्या चीनसोबतच्या युद्धातही भारताने या ब्रिटीश तोफेतून शेल डागले होते.

अशी आहे 105 मिमी भारतीय फील्ड गन

भारतीय फील्ड गनची अनेक वैशिष्ट्ये ब्रिटिश L118 लाइट गन सारखी आहेत. ही तोफ हलकी असल्यामुळे ती कुठेही नेली जाऊ शकते.

सर्वात कमी वजनाची तोफ 2380 किलोची, तर सर्वात वजनदार तोफ 3450 किलो वजनाची आहे.

ही तोफ दर मिनिटाला सहा दारूगोळे मारू शकते. या तोफेमध्ये उणे 27 अंश सेल्सिअस ते 60 अंश तापमानापर्यंत काम करण्याची क्षमता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT