ARNAV GOSWAMI 
देश

अर्णब गोस्वामींना झटका; तपास CBI कडे देण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  अन्वय नाईक प्रकरणात रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुप्रिम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यास नकार दिला आहे. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी अर्णब गोस्वामी यांनी सुप्रिम कोर्टाकडे केली होती. पण, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली असून याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. 

न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये अशी मागणी याचिकेत आहे. तसेच तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी इच्छा याचिकेत करण्यात आली आहे. पण ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याचिका मागे घेणेच चांगले होईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सीरमच्या CEO नीं मानले PM मोदींचे आभार; देशात पहिली लस देण्याचा व्यक्त केला...

महाराष्ट्र पोलिसांकडून रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यानंतर अर्णब गौस्वामी यांनी सुप्रिम कोर्टाचे दार ठोवावले होते. कोर्टाने गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली असून तपास सीबीआयकडे देण्यासही नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी स्थानिक न्यायालयात जावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यानंतर गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी याचिका मागे घेतली आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्या सह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाद्वारे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं 13 हजारांनी, चांदी 12,500 रुपयांनी स्वस्त! 18 कॅरेट सोनं 93 हजारांवर; पाहा ताजे दर

IND vs NZ, 1st Test: देवदत्त पडिक्कलची सेन्चुरी हुकली, पण केएल राहुलसोबतच्या दीडशतकी भागीदारीनं घडवला इतिहास

Marathwada Cold : मराठवाड्यात थंडीचा कडाका, उदगीरचे तापमान १०.७ अंशांवर

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात थंड सकाळ; सांताक्रूझमध्ये १६.२ तर पुण्यात पारा ११.२ अंशांवर

जिमसाठी अन्न परवाना बंधनकारक, एफडीएचे नियम; 'एफएसएसएआय'कडे नोंदणी आवश्यक

SCROLL FOR NEXT