Reservation for Marathas from OBC in Telangana Karnataka Sambhaji Raje pc after meeting backward class commission 
देश

तेलंगणा-कर्नाटकात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, मग राज्यात...; संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जातं. कर्नाटक आणि तेलंगणाने मागासवर्गीय आयोगाकडे विनंती केलीये की आता आम्हाला केंद्राच्या यादीमध्ये घ्या

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जातं. कर्नाटक आणि तेलंगणाने मागासवर्गीय आयोगाकडे विनंती केलीये की आता आम्हाला केंद्राच्या यादीमध्ये घ्या.ते होण्याची शक्यता आहे. राज्य मासागवर्ग आणि सरकारची आता जबाबदारी नाही का? प्रश्न सुटू शकतात, त्यासाठी तयारी हवी, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

कर्नाटक आणि तेलंगणातील लोकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मग आपले प्रश्न का सुटत नाही. यासाठी हे प्रयत्न युद्धपातळीवर सोडवले जाणे आवश्यक आहे. सरकारने गांभीर्याने घेण्याची आवश्यक आहे. मी सांगितलेले मुद्दे मागासवर्ग आयोगाला पटले आहेत, असं ते म्हणाले. इतर राज्यात आरक्षण असलेल्या जातींना दुसऱ्या राज्यात आरक्षण का नाही? असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी दावा केल्यानुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे सापडत आहेत. या कागदपत्रांचा आधार घेत मराठा जातीचा क्रमांक ८३ मध्ये समावेश करावा. अशी मागणी तुम्ही राज्य मासागवर्गाकडे करु शकता का? असा प्रश्न केंद्रीय मासागवर्गाकडे आम्ही केला. पण, त्यांनी उत्तर दिलेलं नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

जोपर्यंत राज्य मागासवर्गाला ताकद देत नाही, फंड देत नाहीत तोपर्यत कुठलेही प्रश्न सुटू शकत नाही. कोणत्याही प्रकारचे सर्व्हेक्षण सुरु करण्यासाठी मागासवर्ग सबळ असणे आवश्यक आहे. बिहारसारखं इतर राज्यात जातीनिहाय सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

२५ राज्यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे. मग महाराष्ट्राला काय अडचण आहे, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. मागासवर्ग आयोगासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आरक्षणाचा मार्ग सरकार काढू शकतं, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT