Fauzia Khan sakal
देश

धनगर आरक्षण मुद्दा संसदेत

अनुसूचीत जाती-जमातीच्या यादीत काही जातींचा समावेश करण्याबाबत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : धनगर समाजाला घटनात्मक आरक्षण देण्याचा मुद्दा संसदेत पुन्हा जोरदारपणे उपस्थित झाला आहे. १ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा समावेश केंद्र सरकारच्या अनुसूचीत जातींच्या यादीत करावा अशी मागणी खासदार डॉ. फौजिया खान यांनी राज्यसभेत केली. डॉ. खान यांनी मराठीतून बोलताना, आरक्षण देणे हा गरीबी हटाव कार्यक्रम नसतो तर वंचित समाजाला आवश्यक प्रतीनिधीत्व देण्याचे ते साधन असते असेही सांगितले. केवळ र एवजी ड असल्याने हा मठा समाज आर पासून दीर्घकाळ वंचित राहिला आहे अशीही भावना त्यांनी मांडली.

अनुसूचीत जाती-जमातीच्या यादीत काही जातींचा समावेश करण्याबाबतच्या विधेयकावर बोलताना डॉ. फौजिया खान म्हणाल्या की महाराष्ट्र सरकाने फार पूर्वी म्हणजे १९६७ मध्येच धनगर समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश केला. महाराष्ट्रातील हा एक प्रमुख समाज आहे व त्यांचा समावेश भटक्या जमातींच्या यादीत केला आहे. राज्य सरकार धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण देते. राज्यात अनसुसूचित जमातींच्या यादीत सद्यस्थि तीत एकूण ४५ अनसूचित जमातींचा समावेश असनू त्यांना एकूण ७ टक्के आरक्षण लागूआहे.अनुसुचित जाती व जमाती आदेश (सधुारणा) कायदा, १९७६ नुसार या यादीत धनगर, ओरॉन, धनगड अशी वेगवेगळ्या नावांनी नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या चालीरीती, रूढी,परंपरा, देवदेवता व पारंपारि क व्यवसाय हा ‘धनगड' समाजापेक्षा भि न्न आहेत.

डॉ. खान म्हणाल्या की अलाहाबाद उच्च न्यायालयानेही २००९ मध्ये दिलेल्या एका निकालानुसार धनगर समाजाचा समावेश केंद्राच्याअनसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत सर्वंकर्वंष विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन विरुद्ध मिलिंद कटवारे व इतर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने २८ नोव्हेंबर २०००मध्ये दिलेल्या निकालातही याचे प्रतीबिंब पडले आहे. राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार अनसुचित जमातींच्या यादीमध्ये कोणताही बदल/ सुधारणा करण्याचे व त्यातून कोणाला वगळण्याचे अधिकारफक्त आणि फक्त ससंदेला आहे. त्यामुळे दनगर समाजाची ही प्रलंबित मागणी केंद्राने आता पूर्म करून या समाजाला न्याय द्यावा अशीही मागणी डॉ. खान यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल टप्प्याटप्प्याने 25 रुपयांपर्यंत महागण्याचा इशारा; आज किती आहे दर?

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

KKR vs GT कोलकताचा आज पराभव झाला तर प्लेऑफचे स्वप्न संपणार? आज गुजरातविरुद्ध सामना, पाहा संभावित Playing XI

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT