RBI  esakal
देश

American Express बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने उठवले; 'हे' व्यवहार करता येणार

AMEXवर कुठल्या कारणांसाठी हे निर्बंध लादले होते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी सुमारे 16 महिन्यांनंतर अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर (AMEX) लादलेले व्यावसायिक निर्बंध उठवले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता भारतातील नवीन ग्राहकांना कार्ड जारी करू शकते. पेमेंट सिस्टम डेटा स्टोरेजचे पालन न केल्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यापासून या बँकेच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती.

याबाबत आरबीआयनं एका निवेदनात म्हटलं की, AMEX चे डेटा स्टोरेजकडून आता समाधानकारक पद्धतीनं नियमांचे पालन केलं जात आहे. AMEX नं रिझर्व्ह बँकेच्या 6 एप्रिल 2018 रोजीच्या पेमेंट सिस्टम डेटाच्या संचयनाच्या परिपत्रकासह सादर केलेल्या समाधानकारक अमंलबजावणी होत असल्यानं निदर्शनास आल्यानं 23 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार लादण्यात आलेले निर्बंध तसेच नवीन घरगुती ग्राहकांचे बोर्डिंग तात्काळ प्रभावाने उठवण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेनं का घातली होती बंदी?

RBI ने 23 एप्रिल 2021 रोजी अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर (AMEX) 1 मे 2021 पासून नवीन घरगुती ग्राहकांना कार्ड नेटवर्कवर ऑन-बोर्डिंग करण्यावर निर्बंध लादले होते. जे पेमेंट सिस्टमच्या संचयनाबाबत केंद्रीय बँकेच्या 6 एप्रिल 2018 च्या नियमांशी विसंगत काम करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT