Reserve Bank of India sakal
देश

Reserve Bank of India : दोन हजार रुपयांच्या नोटा टपालाने पाठविण्याची परवानगी

१९ मे रोजी ‘आरबीआय’ने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर असलेले लोक दोन हजार रुपयांच्या नोटा पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट प्रादेशिक कार्यालयांना पाठवू शकतात, असे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे. नागरिकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी पोस्टाच्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

यासाठी विमा संरक्षण असलेली पोस्टाची सुविधा आणि ‘टीएलआर’ अर्थात ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल अर्जाच्या माध्यमातूनही रिझर्व्ह बँकेने नोटा जमा करण्याची सुविधा दिली आहे. यामुळे ग्राहकांचा विशिष्ट शाखांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी प्रवास करण्याचा आणि रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल, असे ‘आरबीआय’चे प्रादेशिक संचालक रोहित दास म्हणाले.

‘टीएलआर’ आणि विमा उतरवलेली पोस्ट सुविधा हे दोन्ही पर्याय अत्यंत सुरक्षित आहेत. एकट्या दिल्ली कार्यालयाला आतापर्यंत सुमारे ७०० ‘टीएलआर’ अर्ज प्राप्त झाले असून, या पर्यायांबाबत लोकांच्या मनात कोणतीही भीती नसल्याचे यावरून दिसून येते, असेही रोहित दास यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातील नोटा बदली किंवा जमा करण्याच्या सुविधेव्यतिरिक्त हे दोन पर्यायही उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

१९ मे रोजी ‘आरबीआय’ने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. दिल्लीतील प्रादेशिक कार्यालयाने ज्येष्ठ नागरिक आणि ‘दिव्यांग’ यांच्यासाठी वेगळी रांग देऊन विशेष व्यवस्था केली असून, केवळ दोन ते तीन कमी चलनी नोटा घेऊन येणाऱ्यांसाठी वेगळी रांग आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधाही देण्यात आली आहे,

असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

दोन हजार रुपयांच्या नोटा सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत बदलून किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही अंतिम नंतर मुदत सात ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. बँक शाखांतील ठेव आणि विनिमय सेवा सात ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT