देश

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; हायकमांडवर उघड नाराजी

कॅप्टन अखेर पायउतार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली (अमृतसर) : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आज मोठे निर्णायक वळण मिळाले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅप्टन समर्थक आमदार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींकडून माझ्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने अवमान झाल्याची खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. आपल्यासमोर सर्व राजकीय पर्याय खुले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यपाल बी.एल.पुरोहित यांच्याकडे कॅप्टन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केले. अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्येच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीच घेतील असे ठरले. या बैठकीला ७८ आमदार उपस्थित होते त्यात काही कॅप्टन समर्थकांचा देखील समावेश होता. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. यानंतर माध्यमांशी बोलताना पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांनी अमरिंदरसिंग यांचे कौतुक केले.

सकाळीच माहिती दिली

माध्यमांशी बोलताना कॅ. अमरिंदरसिंग म्हणाले की, ‘‘काँग्रेस हायकमांडला मी सकाळीच राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. सलग तिसऱ्यांदा मला दिल्लीला बोलावून घेण्यात आले. माझ्या कार्यशैलीवर शंका उपस्थित करण्यात आली. यामुळे माझी मलाच लाज वाटू लागली आहे. खरेतर माझ्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. मी सध्या काँग्रेस पक्षातच आहे. सिद्धूला मी खूप चांगले ओळखतो. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुख त्यांचे मित्र आहेत.

काँग्रेस पक्षाला आता नव्या नेतृत्वाची गरज आहे, राहुल यांची तयारी असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा. खुद्द सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायची तयारी दर्शविली

चाळीस आमदारांची नाराजी

कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत पंजाबमधील चाळीस आमदारांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिले होते. यानंतरच शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचे ठरले. पक्षप्रभारी हरीश रावत यांनी तशी माहिती अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT