Arvind Kejriwal and Rahul Gandhi esakal
देश

Resting in pieces : काँग्रेसमधील फुटीनंतर ‘आप’चं खोचक ट्विट; वाहिली थेट श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सध्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात काँग्रेसची (Congress) 'भारत जोडो यात्रा' सुरू असतानाच गोव्यात (Goa Politics) भाजपनं (BJP) काँग्रेसला जबर धक्का दिलाय. गोव्यात काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आल असून काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावरून आम आदमी पक्षाने काँग्रेसवर खोचक टीका करत थेट पक्षाला श्रद्धांजली वाहिली आहे. (Congress news in Marathi)

आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ऑपरेशन लोटस दिल्ली आणि पंजाबमध्ये अयशस्वी झाले, गोव्यात यशस्वी झाले... कारण जेव्हा तुम्ही काँग्रेसला मत देता, तेव्हा तुम्ही भाजपचा भावी आमदार निवडता." चढ्ढा यांनी थेट काँग्रेसला श्रद्धांजली वाहत, काँग्रेस संपली, म्हणत रेस्ट ईन पीस म्हटलं आहे.

गोव्यात 40 जागांपैकी 'आप'कडे दोन जागा आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असण्याव्यतिरिक्त, हे तिसरे राज्य आहे जिथे आपचे अस्तित्व आहे.

तत्पूर्वी केजरीवाल यांनी देखील गुजरात दौऱ्यात ‘काँग्रेस संपली’ असे म्हटले होते. केजरीवाल गुजरातमध्ये म्हणाले की, दोन महिने बाकी आहेत, भाजप जात आहे, आम आदमी पार्टी येत आहे. गुजरातमधील सर्व जागा आम्ही लढवू, असंही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT