vegetables  Sakal
देश

किरकोळ महागाई आठ महिन्यांच्या उच्चांकावर, घाऊक महागाईतही वाढ

सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईतही वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या (Crude Oil ) किमतीत वाढ होत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नसले तरी, महागाई मात्र वाढत असून, सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जानेवारीमध्ये हा दर 6.01 टक्के होता, त्यात वाढ नोंदवण्यात आली असून, किरकोळ महागाई दर 6.07 टक्के झाला आहे. (Retail Inflation Rises In February)

सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईतही वाढ झाली आहे. घाऊक महागाई फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्के होती, तर जानेवारी 2022 मध्ये 12.96 टक्के होती. किरकोळ महागाईचा हा दर रिझव्‍‌र्ह बँकेने चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असून, वाढत्या महागाईचा हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागू शकते.

विशेष म्हणजे, युक्रेनच्या संकटाच्या काळात जगभरात तेल, वायू आणि धातूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे भारतातही महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत चलनवाढीचा दर जवळपास 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला असून, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, जेणेकरून महागाईवर नियंत्रण ठेवता येईल. कच्च्या तेलाच्या बाजारभावानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले तर महागाई आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे भारतातील आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ, फळे आणि भाज्यांच्या किमतीही वाढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT