Retired IAS officer parameswaran iyer esakal
देश

सेवानिवृत्त IAS परमेश्वरन अय्यर यांची NITI आयोगाचे नवीन CEO म्हणून नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

अय्यर हे सध्याचे CEO अभिताभ कांत यांची जागा घेतील.

केंद्र सरकारनं निवृत्त IAS अधिकारी परमेश्वरन अय्यर (Parameswaran Iyer) यांची नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलीय. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं (Department of Personnel and Training) शुक्रवारी त्यांची नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीनंतर, पुढील दोन वर्षे ते हे पद सांभाळतील.

अय्यर हे सध्याचे CEO अभिताभ कांत (Amitabh Kant) यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटलंय की, अमिताभ कांत यांची नियुक्ती ज्या अटी व शर्तींच्या आधारे करण्यात आली, त्या अटींवरच अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलीय.

आज चंपारणमध्ये आयोजित 'सत्याग्रह से स्वच्छाग्रह' कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमागं परमेश्वरन अय्यरजी यांचा हात असल्याचं सांगितलं. अय्यर यांनी देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात महत्त्वाची भूमिका बजावलीय. पीएम मोदींनी (Narendra Modi) त्यांना या मिशनचा हिरो संबोधलंय. पंतप्रधान मोदींनी अय्यर याचं जोरदार कौतुक केलं.

परमेश्वरन अय्यर कोण आहेत?

अय्यर यांनी 2009 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. परमेश्वरन अय्यर यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये वरिष्ठ ग्रामीण जल स्वच्छता विशेषज्ञ म्हणूनही काम केलंय. परमेश्वरन अय्यर 2016 मध्ये पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव म्हणून परत आले. अय्यर हे स्वच्छ भारत अभियानाची ताकद होते. त्यांच्या कार्यकाळात देशात अनेक शौचालये बांधण्यात आली. जुलै 2020 मध्ये, त्यांनी पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आणि नंतर अमेरिकेतील जागतिक बँकेत सामील झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT