retired senior police officer of the Jammu and Kashmir police was shot dead by terrorists  
देश

जम्मू-काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; मशिदीमध्ये अजान प्रार्थनेवेळी हल्ला

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मशिदीमध्ये प्रार्शना करत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. (retired senior police officer of the Jammu and Kashmir police was shot dead by terrorists )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफी मिर हे निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिक्षक Senior Superintendent of Police (SSP) होते. मशिदीमध्ये अजान प्रार्थनेवेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

हल्ल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरलं असून तपास सुरु करण्यात आला आहे. हल्ल्यामध्ये मिर यांना गंभीर इजा झाली होती. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मागील आठवड्यात श्रीनगरच्या इदगाह मशिदीजवळ एका पोलीस अधिकाऱ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT