Narendra Modi Sakal
देश

निवृत्तीचं वय, पेन्शन वाढण्याची शक्यता; जाणून घ्या सरकारची योजना

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांच्या सूचना

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता त्यांचं निवृत्तीचं वय आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंतप्रधनांच्या आर्थिक सल्लागार समितीच्यावतीनं सरकारला काही सूचना करण्यात आल्या आहेत.

यांसदर्भातील रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला कमीत कमी २,००० रुपये पेन्शन दिली जावी. याद्वारे आर्थिक सल्लागार समितीनं देशात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर जर अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांचं निवृत्तीचं वय वाढवणं अत्यावश्यक असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. सामाजिक सुरक्षा यंत्रणेवरील दबाव कमी करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं. तसेच ५० वर्षांवरील नागरिकांसाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम सुरु करण्यासंदर्भात मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

सरकारला धोरण आखणं गरजेचं

या अहवालानुसार, केंद्र आणि राज्यांना असं धोरणं तयार करणं गरजेचं आहे. ज्यामुळे कौशल्य विकास होऊ शकेल. या प्रयत्नांमुळं असंगठीत क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे स्थलांतरीत नागरिक यांनाही सहभागी करुन घ्यायला हवं.

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस २०१९ नुसार, सन २०५० पर्यंत भारतात सुमारे ३२ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या असेल. म्हणजेच देशाच्या लोकसंख्येपैकी १९.५ टक्के लोक सेवानिवृत्तीच्या गटात येतील. सन २०१९ मध्ये भारताची लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के लोक किंवा १४ कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगिरीत येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT