Rinki Bhuyan wife of Assam CM Himanta Biswa Sarma
Rinki Bhuyan wife of Assam CM Himanta Biswa Sarma  sakal
देश

आसामचे मुख्यमंत्री सरमांच्या पत्नीचा मनीष सिसोदियांवर मानहानीचा दावा

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांची पत्नी रिंकी भुयान यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसनाची दावा दाखल केला आहे. पीपीई कीट कंत्राट वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. रिंकी यांचे वकील पद्माकर नायक यांनी ही माहिती दिली. कामरूप महानगर जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. सिसोदिया यांनी चार जून रोजी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सरमा तसेच रिंकी भूयान यांच्या लौकिक तसेच स्थानाला धक्का देणारे आरोप केले होते.

आसाम सरकारने इतर कंपन्यांकडून प्रत्येकी ६०० रुपये दराने पीपीई कीट खरेदी केली. त्याचवेळी सरमा यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या व्यावसायिक भागीदारांच्या कंपन्यांकडून प्रत्येकी ९९० रुपये दराने तातडीने खरेदी करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण फेब्रुवारी २०२० मधील असून सरमा तेव्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT