देश

नदीचे पाणी अडल्याने सरोवराची निर्मिती;गाळामुळे अडला ऋषीगंगा नदीचा प्रवाह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून गाळ साठल्याने ऋषीगंगा नदीचा वरील भागातील प्रवाह रोखला गेला आहे. नदी वाहण्याचे थांबल्याने त्याला सरोवराचे रूप आले आहे. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने जर हे सरोवर फुटले तर डोंगराळ भागातून पाणी वेगाने खाली वाहण्याचा व त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी चिंतेचे कारण नसले तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत शुक्रवारी म्हणाले. 

उत्तराखंड जलतांडव ज्या ठिकाणी झाले तेथील उपग्रह छायाचित्र आणि तज्ज्ञांच्या अहवालात हा धोका निदर्शनास आणून दिला आहे. अजून एक संकट टाळण्याच्यादृष्टिने संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ), राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि अन्य संस्था नियोजन करीत आहे. सरोवर तयार झाल्याच्या घटनेवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमचे पथक सरोवराजवळ पोचले आहे. ड्रोन, मानवविरहित विमाने व काही संस्था पाहणी करीत आहे, असे ‘एनडीआरएफ’चे सरसंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. घटनास्थळावरील सत्य स्थिती पाहून त्याचे विश्‍लेषण करून योग्य कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. 

ऋषीगंगेवरील कृत्रिम सरोवराचे व्हिडिओ छायाचित्रण हेलिकॉप्टरद्वारे केले असून हे सरोवर फुटबॉलच्या मैदानापेक्षा तिपटीने मोठे आहे, असे प्रधान म्हणाले. पुराचा अंदाज व्यक्त करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने ट्विटरवर ऋषीगंगा नदीवर ३५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर उंचीचे व १० अंश उताराचे सरोवर तयार झाले असल्याची माहिती दिली आहे. 

जोशीमठ येथे रैणी गावाजवळ सरोवर निर्माण झाले असल्याची माहिती समजली. ही बाब चिंतेची नसली तरी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञ यावर काम करीत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे तज्ज्ञांना पाठविण्याचे नियोजन आम्ही करीत आहेत. 
त्रिवेंद्रसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT