Landslide in Monsoon esakal
देश

Landslide in Monsoon: पावसाळ्यात का वाढतो भूस्खलनाचा धोका.? भूस्खलन म्हणजे नेमंक काय? जाणून घ्या प्रमुख कारणे

What is Landslides & Reasons for this Natural Calamity: पावसाळ्यात डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Monika Lonkar –Kumbhar

Landslide in Monsoon : पावसाळा सुरू झाला की, पर्वतीय किंवा डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेक भागांमध्ये या दिवसांमध्ये जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते. नुकतीच केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी आहेत. सध्या या भागात बचाव कार्य जलद गतीने सुरू आहे.

भूस्खलनाच्या या प्रकारच्या घटना दरवर्षी आपल्या देशात होतात. उत्तराखंड, नागालॅंड, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडताना दिसून येतात. हे भूस्खलन म्हणजे नेमक काय? आणि भूस्खलन होण्यामागे काय कारणे आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.

भूस्खलन म्हणजे काय?

डोंगराळ किंवा पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात दगड कोसळणे, जमिन खचणे, चिखलाचा जोरदार प्रवाह किंवा चिखल-दगड आणि ढिगाऱ्यांचा विनाशकारी प्रवाह इत्यादी घटनांना भूस्खलन असे नाव दिले जाते. भूस्खलन म्हणजे केवळ जमिन खचणे नव्हे. चिखलाच्या मोठ्या ढिगाऱ्यांना किंवा प्रवाहाला सामान्यपणे 'मडस्लाईड' असे ही म्हटले जाते. परंतु, हा भूस्खलनाचा एक प्रकार आहे.

भूस्खलनाचे प्रकार

भूस्खलनाचे आतापर्यंत ५ प्रकार दिसून आले आहेत. डोंगराळ भागातील मोठमोठे खडक पडणे, कधी दगड-कपारींचा भाग खाली कोसळणे तर कधी पूर्ण डोंगरच वरपासून खालपर्यंत सरकतो. भूकंप, पूर आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांसह भूस्खलनाच्या घटना देखील अनेकदा घडतात.

भूस्खलन होण्यामागची कारणे कोणती?

भूस्खलन होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक घटनांचा समावेश आढळून येतो. परंतु, यामध्ये निसर्गातील मानवाचा वाढलेला हस्तक्षेप हे देखील भूस्खलन होण्यामागचे प्रमुख कारण मानले जाते.

महत्वाची बाब म्हणजे प्रमुख ३ कारणांमुळे विनाशकारी भूस्खलन होते. यातील पहिले प्रमुख कारण म्हणजे, मोठ्या प्रमाणात वाढलेली जंगलतोड होय. निसर्गातील हा सर्वात मोठा हस्तक्षेप मानला जातो. भूस्खलनाचे हे प्रमुख कारण आहे.

जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि डोंगरावरील मोठ्या खडकांची पकड ही सैल होते. झाडांची मुळे, माती हे खडकांना बांधून किंवा स्थिर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, जेव्हा जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते, तेव्हा डोंगरावरील मोठे खडक सैल होऊ लागतात आणि कालांतराने भूस्खलनाच्या घटना घडतात.

जंगलतोड व्यतिरिक्त, भूकंप आणि मुसळधार पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते. याच कारणांमुळे, हिमालयातील कुमाऊं भागातील सुमारे ४० टक्के भाग हा भूस्खलनासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. अतिवृष्टी झाली की, डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अलीकडच्या काही काळात हिमालय, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटना या अतिवृष्टीमुळे झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT