Lalu Yadav esakal
देश

RJD अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

सकाळ डिजिटल टीम

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांची प्रकृती अचानक बिघडलीय.

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांची प्रकृती अचानक बिघडलीय. त्यांना दिल्लीतील एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय. गुरुवारी लालू यादव पाटणा विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. आज अचानक त्यांना एम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलंय. मात्र, आरजेडी अध्यक्षांना अचानक आपत्कालीन विभागात (AIIMS) का दाखल करण्यात आलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालू यादव गुरुवारी पाटण्याहून दिल्लीला रवाना झाले होते. आज त्यांना एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलंय.

गुरुवारी पाटण्याहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी लालू यादव यांनी बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. नीती आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी नितीश सरकारला चांगलंच घेरलं होतं. लालू यादव म्हणाले, बिहार शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात खूपच मागं आहे, अशी त्यांनी नितीश सरकारवर केली होती.

लालू यादव दिल्ली एम्समध्ये दाखल

लालू यादव यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नाहीये. याच कारणामुळं तुरुंगात असतानाही त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी त्यांच्यावर रिम्समध्ये उपचारही सुरू होते. तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतरही लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतच होते. अनेक महिन्यांनी ते पाटण्याला पोहोचले. मात्र, पुन्हा एकदा ते गुरुवारी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी बिहारमधील नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT