manoj jha and Yogi Aditynath 
देश

गांधी हत्येवेळी ट्रायल झाली नाही, मग...; अतीक-अशरफ मर्डरवरून RJDचा योगी सरकारवर हल्लाबोल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : अतिक अहमद आणि अशरफ यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता या प्रकरणी विरोधक यूपी सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. अतिक आणि अश्रफ हत्याकांडावरून सर्व विरोधी पक्षांनी यूपी सरकारवर तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत.

या मुद्द्यावर बोलताना आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, स्वतंत्र भारतात तुम्ही याआधी पाहिलं असेल की, कोणीतरी पत्रकाराची भूमिका घेऊन कॅमेराच्या लेन्समधून उडवतो, हे पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे. तुम्ही कधी अशा गोष्टी पाहिल्या आहेत का? चित्रपटांमध्येही असे घडत नाही, हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. कायद्याच्या राज्याचा एन्काउंटर होतोय. मात्र अनेक सत्ये पडद्याआड राहतील.

अनेक प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी हे केले गेले, ही चिंतेची बाब असल्याचे आरजेडी नेत्याने म्हटले आहे. विचार करा गांधीजींची हत्या झाली, ट्रायल झाली की नाही? इंदिरा गांधींची हत्या झाली, ट्रायल झाली की नाही? राजीव गांधींची हत्या झाली ट्रायल झाली की नाही? दरवेळी ट्रायल झाली, कारण हा कायद्याचा नियम आहे. अशा घटनामुळे प्रजासत्ताकाबद्दल चुकीचा संदेश जातो. अशा नेत्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो, असंही झा म्हणाले.

राज्यघटनेची शपथ घेऊन आमदार आणि मंत्री झाले आहेत, राज्यघटनेतील कायद्याचे राज्य काय आहे? कधी वाचलेत का? राज्याचा प्रमुख बनलेल्या या व्यक्तीने आपल्या मंत्रिमंडळावर असलेले सर्व खटले मागे घेतले. भीती निर्माण केली जात आहे. तोडफोडीचा उत्सव करण्याची जय्यत तयारी सुरू झाल्याचं झा यांनी नमूद केलं.

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने म्हटल की, जिल्हा न्यायालयापासून सर्वत्र कुलूप लावता येतील का, असं मी सर्वोच्च न्यायालयाला विचारणार आहे. ते कोणत्या तपासाबद्दल बोलत आहे. आम्ही तपास करू म्हणतात. तुमच्या कार्यशैलीचा तपास करणार का? मला आश्चर्य वाटते की भाजपला यापेक्षा चांगला पर्याय सापडला नाही. त्याच राज्यात राजनाथ सिंह मुख्यमंत्री झाले आहेत, कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले आहेत. आपल्या राज्यघटनेची काळजी वाटेल अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही. एका गुंडाला संपवण्यासाठी दुसऱ्या गुंडाला जिवंत करतात, असा आरोप झा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT