nitish kumar 
देश

बिहारमध्ये मोठी घडामोड; नितीश कुमारांचं बळ वाढलं; 'या' पक्षाचा जेडीयूमध्ये विलय

सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहारमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडून येतीय. उपेंद्र कुशवाहा यांनी आज आपला पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये विलय करुन टाकला आहे. कुशवाहा यांनी आज पाटणामध्ये आयोजित केलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये या विलयाची घोषणा केली. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होतीच. या एकत्रीकरणाची घोषणा करताना उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, हा देश आणि राज्याच्या हिताचा निर्णय आहे. 

उपेंद्र कुशवाहा यांनी यावेळी म्हटलंय की, राज्य आणि देशाच्या हितासाठी समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. ही सध्याच्या राजकारणाची गरज आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोक समता पार्टीने जेडीयूसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता त्यांच्यासोबत आहोत.

नितीश मोठ्या भावासारखे
प्रेस कॉन्फरन्समध्ये उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं की, नितीश माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी वैयक्तिकरित्या नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. आणि आता आम्ही असा निर्णय घेतलाय की, राष्ट्रीय लोक समता पार्टीचा सगळा चमू आता मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये काम करेल. देश आणि राज्याच्या परिस्थितीला लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला आहे. आता आम्ही जेडीयूसोबत असू आणि काम करु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT