Accident News esakal
देश

Accident news : स्कूल बस-ऑटोचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार महिलांसह पाच ठार

रवींद्र देशमुख

कासारगोड : केरळच्या कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना घरी सोडल्यानंतर परतणाऱ्या एका वेगवान बसने ऑटोला धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोचालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

बडियाडका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बस चुकीच्या दिशेने वेगात जात होती. त्यामुळे हा अपघात झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती. त्यामुळे बसमध्ये मुलं नव्हती.

या भीषण अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून लवकरच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. मृत चारही महिला एकाच कुटुंबातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT