Agra Accident esakal
देश

Agra Accident : धुक्यामुळे झाला अपघात, रात्रभर गाड्या मृतदेहावरुन जात राहिल्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीतल्या कंझावला येथील घटनेनंतर देश हळहळला असतांना आता आग्र्यामध्ये त्यापेक्षाही भयंकर घटना घडली आहे. या अपघाताच्या घटनेने पोलिससुद्धा हादरुन गेले आहेत.

आग्रा येथे एक अपघात झाला. भिंड जिल्ह्यातल्या तरुणाचा धुक्क्यांमुळे तरुणाचा रस्त्यावरच मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्रभर त्याच्या मृतदेहावरुन वाहनं जात होती. मृतदेहाचे तुकडे होऊन चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठलं.

हेही वाचाः ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सोमवारी सकाळी पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली. आग्र्याचे एसीपी मयंक तिवारी यांनी सांगितलं की, तरुणाचा मृत्यू दाट धुक्यामुळे झाला. एका वाहनाने त्याला धडक दिली आणि त्याच्यावरुन गाड्या गेल्या. मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव शिनाख्त गौवर नरवरिया असल्याचं सांगितलं जात आहे.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना मृतदेह गोळा करणं अवघड होऊन बसलं होतं. मृतदेहावरुन अनेक गाड्या गेल्याने मांस रस्त्याला चिटकलं होतं. पोलिसांनी फावडा घेऊन मांस गोळा केलं आणि बॉडी पोस्ट मार्टमला पाठवली.

दरम्यान, दिल्लीची घटना सध्या देशभर चर्चिली जात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहाटे दिल्लीमध्ये ही घटना घडली. एका तरुणीला कारने १३ किलोमीटर फरफटत नेलं. कारमध्ये पाच जण होतं. ही कार वेगवेगळ्या चार पोलिस ठाण्यांसमोरुन गेली पण कुणालाही पत्ता लागला नाही. घटनेमध्ये पीडित तरुणीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT