road accident in manipur two school buses overturned death of 5 students 20 injured  
देश

Manipur Bus Accident : मणिपूरमध्ये भीषण अपघात! स्कूल बस उलटल्याने ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू, २० जखमी

सकाळ डिजिटल टीम

Manipur Bus Accident : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात स्कूल बसाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात स्कूलबस उलटून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान 20 जण जखमी झाले आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 55 किमी अंतरावर लोंगसाई भागाजवळ ओल्ड कछार रोडवर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, थम्बलानू हायर सेकंडरी विद्यालयातील विद्यार्थी दोन बसमधून नोनी जिल्ह्यातील खौपुम येथे वार्षिक शालेय अभ्यास दौऱ्यावर गेले होते. विद्यार्थिनी ज्या बसमध्ये प्रवास करत होत्या, ती बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना या अपघातावर प्रतिक्रिया देताना, आज ओल्ड कछार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसच्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमधील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना. जखमी विद्यार्थ्यांना राज्याच्या राजधानीत उपचारासाठी नेण्यात येत आहे. असे म्हटले आहे.

दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये दोन बसचा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे. या दुर्घटनेत 15 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. बस यारीपोक येथील थम्बलनू उच्च माध्यमिक विद्यालयासाठी होती. ती खौपूमकडे जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT