road accident tanker rolls royce collide  
देश

Accident News : ऑईल टँकर-रोल्स रॉयसची जोरदार धडक! टँकरमधील दोघांचा मृत्यू

रवींद्र देशमुख

नूह, : हरियाणाच्या नूह येथे दिल्ली-मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गावर एका अवजड ऑईल टँकर आणि कारची जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात टँकरचालक आणि त्याच्या सहाय्यकाचा मृत्यू झाला. तर रोल्स रॉयस कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.

नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी गावाजवळ मंगळवारी दुपारी चुकीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरने कारला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टँकरला धडकल्यानंतर रोल्स रॉयस कारने लगेच पेट घेतला. मात्र दुसऱ्या कारमध्ये असलेल्या लोकांनी रोल्स रॉयसमधील प्रवाशांना वेळीच बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघातात ठार झालेल्या टँकरचालकाचे नाव रामप्रीत आणि त्याचा सहाय्यक कुलदीप असे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. पोलिसांनी सांगितले की, रोल्स रॉयसमधील तीन जखमीमध्ये चंदीगडची रहिवासी दिव्या आणि तस्बीर तसेच विकास यांचा समावेश आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितलं की, जखमींचा जबाब घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT