देश

निपाणीत एका रात्रीत तीन ठिकाणी मोबाइल दुकानात चोरी

ऱादेराजेंद्र हजारे

निपाणी - बंद घराचे कुलूप तोडून दागिने लांबविण्याच्या प्रकारानंतर आता चोरट्यांनी मोबाईल दुकानांना लक्ष केले आहे. एकाच रात्रीत शहरातील मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेच्या ठिकाणी तीन मोबाईल दुकानात चोरी करून २७ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी ( ता.१५) सकाळी उघडकिस आली. त्यामुळे निपाणी येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

चाटे मार्केटमधील राजू मुल्ला यांच्या एस. एस. कम्युनिकेशन, अशोक नगरातील कुणाल नरके यांच्या एमआय शोरूम आणि रोहन शहा यांचा मंत्रा मोबाईल दुकानात चोरट्यांनी ही चोरी केली आहे.

याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अशोक नगरातील कुणाल नरके यांचे गेल्या वर्षभरापासून मोबाइलचे दुकान सुरु आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याचे नूतनीकरणाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे  रविवारी (ता. १४)  रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले होते. त्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून विविध कंपन्यांचे सुमारे १५ लाखाचे मोबाइलची चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे  अधिक चौकशी केल्यानंतर तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. चोरीच्या वेळी चार चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून बाहेर दोघेजण थांबल्याची माहिती उपलब्ध होत आहे. सर्वच चोरट्यांनी आपल्या तोंडाला रूमाल बांधून आत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर चोरट्यांनी केवळ १० मिनिटांतच चाटे मार्केटमधील राजू मुल्ला यांच्या एसएस कम्युनिकेशन या मोबाईलसाठी दुकानालाही लक्ष केले. तेथील कुलूपही तोडून चोरट्यांनी प्राथमिक अंदाजानुसार १२ लाखाचा ऐवज लांबविला आहे. यावेळी दुकानात दोन कर्मचारी असूनही त्यांना चोरट्यांनी धमकावून मोबाइल लांबवण्यात आले आहेत. सकाळी सात वाजता दोन्ही घटना उघडकीस आल्या. 

त्यानंतर रोहन शहा त्यांच्या मंत्रा या मोबाईल दुकानात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण हाती काही न लागल्याने त्यांनी पाेबारा केला. मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक पोलीस उपनिरीक्षक ए. के. नदाफ, पोलिस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला  व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला. यावेळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT