priyanka gandhi 
देश

प्रियांका गांधी होम क्वारंटाइन; रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे कोरोना संक्रमित झाले आहेत. रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहलंय की, मित्रांनो, दुर्भाग्याने मी कुणा कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आलो आहे आणि मी देखील कोरोना संक्रमित झालो आहे. मी आतापर्यंत तरी कोरोना असिम्टमॅटीक (लक्षणे नसलेला) आहे. कोरोना गाईडलाईन्सनुसार प्रियंका आणि मी स्वत:ला आयसोलेट करत आहोत. मात्र, प्रियंका कोरोना निगेटीव्ह आहे. 

रॉबर्ट यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहलंय की, सौभाग्याने यावेळेला मुले आमच्यासोबत नाहीयेत. तसेच घरातील इतर सर्व सदस्य निगेटीव्ह आहेत. आशा आहे की, लवकरच आम्ही आमचं सामान्य आयुष्य जगू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील एका ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, अलिकडेच कोरोना संक्रमणाच्या संपर्कात आल्याने मला माझा आसाम दौरा रद्द करावा लागतोय. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहतेय. या असुविधेसाठी मी आपल्या सर्वांची माफी मागते. मी काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

School Robotics Lab: एआयमुळे शिक्षकांची भूमिका बदलली; घोडेगावातील कार्यशाळेत राजीव नंदकर यांचे प्रतिपादन

Balapur Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक, पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT