देश

कोरोनावर 'Roche'चे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध

सूरज यादव

नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लशीच्या (Corona Vaccine) लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी लशींच्या तुटवड़्यामुळे त्याचाही वेग कमी आहे. सध्या भारतात (India) दोन लशी दिल्या जात असून रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसही आता दाखल झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे डीआरडीओने तयार केलेलं अँटिकोविड औषधही लाँच झालं आहे. यातच आता सिप्लाने (Cipla) मोठी घोषणा केली आहे. आघाडीची औषध कंपनी रोशे इंडिया (Roche India) आणि सिप्ला यांनी सोमवारी भारतात रोशेची अँटिबॉडी कॉकटेल (Antibody Cocktail) लाँच करण्याची घोषणा केली. या औषधाचा वापर गंभीर रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. (Roche antibody cocktail available in india covid treatment drug)

सिप्ला आणि रोशे यांनी सांगितलं की, अँटिबॉडी कॉकटेलची पहिला खेप भारतात दाखल झाली आहे. तर दुसरी खेप जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पोहोचेल. यामुळे जवळपास दोन लाख रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. सिप्ला देशभरात हे अँटिबॉडी कॉकटेल देशभरात वितरीत करणार आहे. अँटिबॉडी कॉकटेलच्या एका रुग्णासाठीच्या डोसची किंमत 59 हजार 750 रुपये इतकी आहे. सर्व करांसहीत ही किंमत असून अँटिबॉडी कॉकटेल प्रमुख रुग्णालये आणि कोरोना ट्रिटमेंट सेंटर्समधून औषध उपलब्ध होईल.

अँटिबॉडी कॉकटेलच्या औषधाचा एक डोस हा 1200mg इतका आहे. यामध्ये Casirivimab आणि Imdevimab अशी दोन औषधे असणार आहेत. तसंच एका डोसची किंमत 59 हजार 750 रुपये इतकी आहे. याशिवाय मल्टि डोस पॅकची किंमत 1 लाख 19 हजार 500 रुपये आहे. मल्टिडोस पॅकमध्ये दोन रुग्णांना डोस देता येतील. अँटिबॉडी डोस हा 12 वर्षांवरील सर्वांसाठी आहे. यामध्ये संबंधित रुग्णाचे वजन किमान 40 किलो असायला हवे. गंभीर असणाऱ्या रुग्णांना याचा डोस देता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT