rohini acharya News in Marathi  
देश

Rohini Acharya लालूंच्या कन्येचं भाजप नेत्यांकडून कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट करून म्हणाले....

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वीपणे झाले आहे. लालूप्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी लालूंना किडनी दान केली आहे. रोहिणी आचार्य यांनी वडिलांसाठी किडनी दान केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे. (rohini acharya News in Marathi)

राजकारणी, मंत्री, खासदारांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वच रोहिणी आचार्य यांचे चाहते झाले. रोहिणी आचार्य आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये राहतात. लालू प्रसाद यांच्यावर सिंगापूरमध्येच उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रोहिणी आचार्य यांचा फोटो शेअर करत लिहिले की, "बेटी हो तो रोहिणी आचार्य जैसी", आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उदाहरण असाल. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "देवाने मला मुलगी दिली नाही. आज रोहिणी आचार्य यांना पाहून मला खरंच देवाशी भांडण करावसं वाटतं. माझी आजी नेहमी म्हणायची की कुलवंती असलेल्या मुलीपेक्षा मुलगा चांगला आहे.

भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारीलाल यादव यांनीही ट्विट करत रोहिणीचं कौतुक केलं. त्यांनी लिहिले की, आज रोहिणी जे केलस त्याचा प्रत्येक बापाला अभिमान वाटत असेल. मुलगी होणे हा एक बहुमान आहे, आज पुन्हा एकदा संपूर्ण जगाने हे पाहिले आहे.

भाजप बिहारचे प्रवक्ते निखिल आनंद म्हणाले, "रोहिणीने आपल्या वडिलांची एक महान मुलगी बनून दाखवत स्वत:चा ठसा उमटवला आहे. तिने इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT