देश

रोहित वेमुलाची आई मुख्यमंत्र्यांच्या भेटीस; रेड्डींचे फेरचौकशीचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

हैदराबादः हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे देशभर खळबळ निर्माण झाली असताना त्याची आई राधिका वेमुला यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भेट घेतली.

या प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. रेड्डी यांनीही या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आश्वासन देत या प्रकरणी न्याय मिळवून देऊ असे म्हटले आहे.

दरम्यान या क्लोजर रिपोर्टमध्ये रोहित हा दलित समाजाचा नव्हता तसेच त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती. ती उघड होतील या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. या प्रकरणात आरोपी असलेल्या केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यासह इतर बड्या नेत्यांना क्लीनचिट देण्यात आली होती.

याबाबत बोलताना भाजपचे माजी आमदार सी.एन. रामचंदरराव म्हणाले की काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या मुद्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. रोहितची आत्महत्या दुःखद आहे पण काँग्रेस आणि डाव्या पक्षांची भूमिका अधिक निषेधार्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात धुवांधार; प्रशासनाची उडाली तारांबळ

Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

SCROLL FOR NEXT