Delhi Airport VIDEO Esakal
देश

Delhi Airport VIDEO : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना, पावसामुळे अचानक छताचा भाग कोसळला; अनेक वाहनांचे नुकसान, 3 जण जखमी

Delhi Airport VIDEO : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छतही कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुसळधार पावसामुळे नोएडा आणि दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छतही कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

दिल्ली-एनसीआरमध्ये पहिल्या मोठ्या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असतानाच, दुसरीकडे एक दुर्घटना घडली आहे. आज (शुक्रवारी) पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छतही कोसळल्याची घटना घडली आहे. अनेक वाहनांचे नुकसान यामुळे झाले आहे. वाहनांमधून जाणारे तीन जण गंभीर जखमी झाले असून एक जण अडकल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सकाळी 5.30 च्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत."

या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले असून, त्यात टर्मिनलचे अवजड छत वाहनांवर पडले आहे. कारमध्ये बसलेले लोकही यात अडकले आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. नोएडा, दिल्ली आणि लगतच्या भागात तासाभराहून अधिक काळ जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्तेही जलमय झाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे.

नोएडातील रस्त्यांवर साचले पाणी

नोएडा शहर परिसरात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले होते. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सेक्टर-९५ मध्ये रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे वाहनांचा वेगही कमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT