Seema Haider Esakal
देश

Seema Haider: सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री? सोनिया गांधींशी तुलना करत 'या' पक्षानं दिली ऑफर

सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री करणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीबद्दल आता संपूर्ण देशाला माहिती मिळालेली आहे. पाकिस्तानातून आपल्या प्रेमासाठी भारतात आलेली सीमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली 4 मुलांची आई आणि ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा गावात आपल्या पबजी प्रियकरासोबत संसार करत असणारी सीमा हैदर अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे.

सचिन आणि सीमाच्या घरातल्यांना बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आल्याने त्यांच्या पोटापाण्याचे अक्षरशः हाल होत आहेत. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती खालावली आहे. ही बातमी व्हायरल होताच, उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला मदतीचा हात दिला आहे. अमित यांनी आपली चित्रपट निर्मिती संस्था जानी फायर फॉक्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या एका चित्रपटात या दोघांनाही अभिनयाची ऑफर दिली आहे. आता या चर्चेनंतर सीमा सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा समोर आली आहे.

सीमाच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली आहे.

‘इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते', असंही ते म्हणाले आहेत. तर ‘सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं’, असंही किशोर मासूम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT