Bihar railway recruitments 
देश

गोळीबारानंतर ट्रेन जाळली... बिहारमध्ये रेल्वे भरतीचा वाद पेटला

ओमकार वाबळे

बिहारमध्ये रेल्वेच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप परिक्षार्थींनी केला. यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. परिक्षा देणाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केला. तर काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला. दरम्यान, आंदोलन चिघळल्यानंतर परिक्षार्थींनी थेट ट्रेन पेटवून दिली. (Bihar Railway Recruitment)

रेल्वे भरती मंडळाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, बिहारमधील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काही काळाने हा विरोध आणखी तीव्र झाला. काही ठिकाणी रेल्वे आडवण्यात आल्या तर काहींनी दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणार आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवर येत ट्रेन आडवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांना विरोध दर्शवण्यात आला.

गया जंक्शनवर पोहोचलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. उपद्रवी विद्यार्थ्यांनी प्रथम गया जंक्शनवर 'श्रमजीवी एक्सप्रेस'वर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी तोडफोड केली. पोलिसांवरही दगड फेकले. यानंतर पोलिसांनी संतप्त विद्यार्थ्यांचा पाठलाग केल्यावर गया स्टेशनला लागून आधीच उभ्या असलेल्या ट्रेनच्या बोगीलाही आग लावण्यात आली.

सीतामढी, मुझफ्फरपूर, नवाडा, बिहारशरीफ, आरा, बक्सर आणि भाबुआ येथे झालेल्या गोंधळामुळे रेल्वे वाहतूकीला फटका बसला आहे. आणि रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. पाटणा, समस्तीपूर आणि छपरा येथेही निदर्शने करण्यात आली. सीतामढीमध्ये दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्या जमावाला पोलिसांनी हवेत गोळीबार करून हटवलंय. तर नवाडा येथे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समोर आलंय.

गया जंक्शनवर गोंधळ निर्माण केल्यानंतर, दंगलखोर विद्यार्थ्यांनी करीमगंजजवळ आधीच उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनला लक्ष्य केलं आणि एक बोगी पेटवली, यामुळे आता ट्रेनची बोगी जळून खाक झालीय. संबंधित प्रकणारचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस व रेल्वे पोलिसांनी एकत्र कारवाई केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आदित्य कुमार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT