RSS Chief Mohan Bhagwat on Voting in Elections Manipur Violence Dasara Melawa 20023 Vijayadashmi Utsav  
देश

Dasara Melawa 20023: अचानक मणिपूर मध्ये हिंसाचार कसा सुरू झाला? मोहन भागवतांचा सवाल... मतदारांना देखील दिला खास सल्ला

नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी उत्सवादरम्यान मोहन भागवत बोलत होते.

रोहित कणसे

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागपुरातील रेशीम बाग मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित आरएसएस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भागवत यांनी आगामी निवडणूकीत मतदान करण्याबाबत तसेच मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.

यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सर्वांनी मतदान करावं असं आवाहन केलं.भागवत म्हणाले की, लक्षात ठेवा निवडणूकीत मतदान करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांनी मतदान केलं पाहिजे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकांनी मतदान करावं यासाठी आरएसएसचे कार्यकर्ते काम करतील. पण आपण मतदान लहान-लहान गोष्टी पाहूण करू नये. मतदान भडकावू भाषणं ऐकून करायचं नाही, तर कोण चांगलं काम केलं याचा थंड डोक्याने विचार करा. आता भारतातील जनतेकडे सर्वांचा अनुभव आहे. त्यामध्ये सर्वात चांगलं कोण उपलब्ध आहे हे पाहूण त्याला मत द्या, असे अवाहन मोहन भागवत यांनी केलं.

मतदानाच्या प्रचारादरम्यान अनेक डावपेच वापरले जातील, आपण त्या आगीत पडणार नाहीत या पद्धतीने काम करा असेही मोहन भागवत म्हणाले.

मणिपूर हिंसाचारामागे कोण?

य़ावेळी मोहन भागवत यांनी मणिपूर हिंसाचारावर देखील भाष्य केलं. भागवत म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती सध्या पुर्वपदावर येत आहे, पण आपापसात हे भांडण कसं झालं. अनेक वर्षांपासून मणिपूरी मैतेइ आणि कुकी एकत्र राहत आले आहेत. अचानक हिंसाचार कसा झाला. ते भारताच्या सीमेवरील क्षेत्र आहे तेथे असा प्रकार होणं यामध्ये कोणाचा फायदा आहे? यामागे कोण होतं असे प्रश्नही भागवत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT