देश

ॲमेझॉन म्हणजे दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच; RSSच्या 'पांचजन्य'चा निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उजव्या विचारधारेशी संबंधित असणाऱ्या ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने ‘इन्फोसिस’पाठोपाठ आता ई-कॉमर्स क्षेत्रातील ‘ॲमेझॉन’ या बहुराष्ट्रीय कंपनीवर निशाणा साधला आहे. या नियतकालिकाने या संदर्भातील मुखपृष्ठकथा प्रसिद्ध केली असून त्यात ‘ॲमेझॉन’ला ‘ईस्ट इंडिया कंपनी-२.०’ अशी उपमा देण्यात आली आहे.

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी नियतकालिकाचे मुखपृष्ठ सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यावर ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मजकुरामध्ये म्हटले आहे की, ‘‘ अॅमेझॉन असे कोणते चुकीचे काम करते ज्यामुळे त्यांना देशामध्ये लाच द्यावी लागते? या महाकाय कंपनीस लोक देशी उद्योग, आर्थिक स्वातंत्र्याला धोकादायक का मानतात?’’ मध्यंतरी ‘ॲमेझॉन’ वर लाचखोरीचेही आरोप झाले होते. केंद्र सरकारने या आरोपींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. खुद्द कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयाने देखील याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. कायदेशीर शुल्कापोटी कंपनीने ८ हजार ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप होतो आहे.

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्या आता ईस्ट इंडिया कंपन्या बनू पाहात आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांचे मॉडेल हे ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच आहे. गुणवत्तेचा फारसा विचार न करता कमी दरामध्ये वस्तू विका आणि स्पर्धा मारा असे या कंपन्यांचे धोरण आहे. यामाध्यमातून बाजारपेठेत मक्तेदारी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो, असं मत कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतीय यांनी मांडलंय.

कंपनीचे निवेदन

या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘अॅमेझॉन’ने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे की,‘‘ कोरोना संकटाच्या काळामध्ये तीन लाख नवे विक्रेते आमच्याशी जोडल्या गेले आहेत. यात साडेचारशे पेक्षाही अधिक शहरांतील ७५ हजार स्थानिक दुकानांचा समावेश आहे. त्यामध्ये फर्निचर, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल फोन, दागिने आणि वैद्यकीय उत्पादनांचा समावेश आहे.’’ कंपनीकडून निर्यात कार्यक्रमाचा देखील दाखला देण्यात आला आहे. लहान आणि मोठ्या शहरांमधील ७० हजार भारतीय उद्योजकांना आमच्या निर्यात कार्यक्रमाचा फायदा झाला असून ‘मेड इन इंडिया’अंतर्गत तयार झालेल्या उत्पादनांना देखील जागतिक बाजारपेठ मिळाली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT