RSS 
देश

संविधानाच्या नावावर वाढतेय तेढ; विशिष्ट समुदायाचा सरकारी यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न: RSS

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असा आरोप केला आहे की, एका खास समुहाद्वारे सरकारी यंत्रणेमध्ये घुसण्याचे नियोजन केले जात असून देशामध्ये संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कट्टरता वाढतच चालली आहे. संघाने काल शनिवारी जारी केलेल्याा आपल्या २०२२ च्या वार्षिक अहवालामध्ये यावर मत मांडलंय.

या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, 'संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्या'च्या आडून 'वाढती धार्मिक कट्टरता' आणि 'एका खास समुदायाकडून सरकार यंत्रणेमध्ये प्रवेश करण्याची विस्तृत योजना' आहे. त्यामुळे 'या धोक्याला तोंड देण्यासाठी संघटीत ताकदीसह प्रयत्नांची' करण्याची गरज बोलून दाखवण्यात आली आहे. संघाचा वार्षिक रिपोर्ट गुजरातमधील अहमदाबाद शहरातील संघाच्या एका बैठकीमध्ये सादर करण्यात आला.

या रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलंय की, देशात वाढत्या धार्मिक कट्टरतेच्या विक्राळ स्वरुपाने सर्वत्र डोकं वर काढलं आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांची नृशंस हत्या हे याचंच उदाहरण आहे. सांप्रदायिक उन्माद, सभा, प्रदर्शन, संविधानाच्या आडून सामाजिक शिस्तिचं उल्लंघन, रीती-रिवाज आणि परंपरांचं तसेच धार्मिक स्वातंत्र्याला चालना देणाऱ्या नृशंस कृत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

हा एक दिर्घकालीन कट असल्याचं सांगत पुढे म्हटलंय की, एका विशिष्ट समुदायाकडून सरकारी यंत्रणेमध्ये प्रवेश करण्यासाठी विस्तृत योजना आखल्या जात असल्याचं समजत आहे. या सगळ्या मागे एक दिर्घकालीन कट आहे. संख्येच्या आधारावर त्यांच्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी कोणताही रस्ता स्विकारण्याची तयारी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT