Pune Airport Esakal
देश

Omicron : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCRचे प्री-बुकिंग अनिवार्य

ओमिक्रॉन विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद ब्रिटनमध्ये करण्यात आली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे विदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी RT-PCR चाचणीचे प्री-बुकींग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) 14 डिसेंबर रोजी हे आदेश जारी केले आहेत. देशातील सहा विमानतळांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसह, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा समावेश असणार आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतातून व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआधी DGCA ने 15 डिसेंबरपासून नियोजित उड्डाणे पुन्हा सुरू होतील असे सांगितले होते. मात्र, ओमिक्रॉनच्या भीतीमुळे या निर्णयात बदल करण्यात आला. त्यानुसार आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दक्षिण अफ्रिकेत आढळला होता पहिला रूग्ण

कोरानाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळून आला होता. (Omicron First case Found In South Africa ) त्यानंतर त्याचा प्रसार होऊन नये यासाठी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध कडक केले आहेत. भारतानेदेखील (Covid Protocol In India) ओमिक्रॉनचा धोका असणाऱ्या हायरिक्स देशांमधून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. तसेच परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ओमिक्रॉनमुळे पहिल्या रूग्णाचा मृत्यू

ओमिक्रॉन विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद ब्रिटनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जगाच्या चिंतेत काहीशी वाढ झाली आहे. आतापर्यंत या विषाणूची कुठलीही गंभीर लक्षणे समोर आली नव्हती. मात्र, आता यामुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT