Nirmala Sitharaman Sakal
देश

Nirmala Sitharaman: रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होतोय; सीतारामन यांचं अजब विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्यानंतर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओ शेअर करून विरोधक भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपयाच्या घसरणीवर अजब विधान केलं आहे. (nirmala sitharaman news in Marathi)

सीतारामन म्हणाल्या की, रुपयाचे अवमूल्यन होत नसून डॉलर मजबूत होत आहे. तसेच रुपया इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.

निर्मला सीतारामन या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकार परिषदेच्या पत्रकाराने त्यांना रुपयाच्या घसरणीबद्दल विचारले तेव्हा अर्थमंत्री म्हणाल्या, की मी याकडे घसरण म्हणून पाहात नाही. रुपयाची घसरण होतेय अस न पाहता, डॉलर मजबूत होतोय. त्यामुळे सहाजिकच डॉलरच्या तुलनेतील चलने कमकुवत होतील, असंही सीतारामन यांनी म्हटलं.

अर्थमंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, डॉलर मजबूत होण्यापासून आपण कसे रोखू शकतो? दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'थंडी वाढत नाही, तर सहनशीलता कमी होत आहे'च्या प्रचंड यशानंतर, रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत होतोय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT