देश

वर्षभरात सुमारे दोन हजार कोटींचे ड्रग्स जप्त, DRIची देशभरातील कारवाई

अनिश पाटील

मुंबई: महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने गेल्या वर्षभरात 421 गुन्ह्यांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स देशभरातून पकडले आहे.  गेल्या दीड महिन्यात आठ प्रकरणांमध्ये मोठ्याप्रमाणात कोकेन आणि हेरॉईन पकडण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागल्यामुळे ड्रग्स तस्करांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तस्करांनी आता तस्करीतील ड्रग्सचा साठा वाढवला असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचलनालयातील (डीआरआय)  सूत्रांनी दिली.

लॉकडाऊनमुळे अनेक देशांनी विमान प्रवासावर बंदी घातली आहे. अनेक देशांमध्ये तुरळक प्रमाणात विमान वाहतूक सुरू आहे. तर काही देशांमध्ये अद्याप विमान वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. त्याचा फटका ड्रग्स तस्करांवर पडला असून त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तस्करीतील ड्रग्सचा साठा वाढवला आहे.

त्याशिवाय त्यांच्या मोड्स ऑपरेंडीमध्येही बदल झालेला आहे. यापूर्वी आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकन देशातील नागरिकांचा तस्करीसाठी वापर केला जायचा. आता मालावियन,  गिनी प्रजासत्ताक यासारख्या देशांतील नागरिकांचा वापर केला जात आहे. तसेच कार्गोचाही मोठा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. यावेळी या तोटा भरून काढण्यासाठी एकावेळी पाठवण्यात येणाऱ्या ड्रग्सच्या साठ्यातही वाढ करण्यात आली आहे.

 केवळ चार कारवायांमध्येच डीआरआयने 24 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशभरातून 421 कारवायांमध्ये 1949 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात डीआरआयला यश आले आहे. तसेच अनेक देशांमध्ये प्रवासी विमान वाहतुकीवर कडक निर्बंध असल्यामुळे छोट्या प्रमाणातील ड्रग्ससाठी कुरियर आणि मोठ्या साठ्यासाठी सागरी मार्गाचा वापर होत असल्याचे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा- धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, लोकलमधून ढकलून देण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत
 
याशिवाय वैद्यकीय सेवेसाठी परदेशी जाण्याच्या नावाखालीही तस्करी करण्यात येत आहे. त्यासाठी गरीब आणि गरजू व्यक्तींचा शोध करून कमी पैशांमध्ये त्यांच्याकडून हे काम केले जाते. त्याला अनेक जण बळीही पडतात. कधीकधी खरच आजारी व्यक्तीलाही त्याच्या उपचाराच्या खर्चाच्या नावाखाली तस्करीत वापर केला जात असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Rupees 2 thousand crore worth restorative seized during year DRI action

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT